Saam Tv
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज वयाची ८० वर्षे गाठली. यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ मध्ये तामिळनाडूत झाला.
प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या अभिनेत्री सह चित्रपट निर्माता, आणि भारतीय राजकारणी आहेत.
अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकूण १०० हून अधिक चित्रपट त्यांनी केले आहेत.
हेमा मालिनी यांचे शिक्षण आंध्रप्रदेश मध्ये झाले . लहान वयातच सिनेसृष्टीत गेल्यामुळे त्यांचे १२ वी पर्यंतच शिक्षण झाले.
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी "सपनो का सौदागर" चित्रपटातून १९६८ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अभिनेत्री हेमा मालिनींचे चित्रपट
अभिनेत्री हेमा मालिनी या हिंदी चित्रपटांसोबतच तामिळ चित्रपटांमध्येही काम करत होत्या.
हेमा मालिनी यांना २००० साली 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार', तर २०१९ मध्ये 'चित्रपटातील ५० वर्षांच्या उत्कृष्ट योगदानासाठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार' देण्यात आला होता.
NEXT : कोजागिरी पौर्णिमेला करा 'या' पद्धतीने पुजा ; होईल एश्वर्यप्राप्ती