Manasvi Choudhary
मालदीव फिरण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र मालदीवचा खर्च अवाक्याबाहेर असतो जो अनेकांना परवडत नाही.
मात्र तुम्हाला माहितीये का? मालदिवसारखे दिसणारे एक ठिकाण भारतात आहे. जेथे जाण्याचा खर्च देखील कमी आहे.
केरळमधील कोची जवळील 'कुंबलांगी' बेटाजवळ असलेले हे ठिकाण 'मिनी मालदीव' म्हणून ओळखले जाते.
कुंबलांगी हे केवळ एक बेट नसून ते भारतातील पहिले पाण्यावर तरंगणारे ठिकाण आहे.. येथे तुम्हाला येथे बॅकवॉटर्सचा आनंद लुटता येईल.
येथील संथ पाणी, हिरवीगार नारळीची झाडे आणि शांतता पर्यटकांना भुरळ घालते.
या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देतात आणि स्विमिंग पूल, स्पा आणि वेलनेस सेंटर्सचा आनंद घेतात.
कोची विमानतळापासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर आहे. रेल्वे किंवा विमानाने तुम्ही येथे सहज पोहोचू शकता.