Dhanshri Shintre
BSNLने भारतात Q-5G (Quantum 5G) तंत्रज्ञानाद्वारे अलीकडेच 5G सेवा सुरू केल्या आहेत.
2G/3G सिम वापरकर्ते BSNL CSC किंवा अधिकृत रिटेलरकडे जाऊन हाय-स्पीड इंटरनेटसाठी सिम अपग्रेड करू शकतात.
बीएसएनएल वेबसाइट किंवा ग्राहक सेवा हेल्पलाइनवरून जवळच्या BSNL CSC किंवा अधिकृत रिटेलरकडे जाण्यासाठी माहिती मिळवा.
सर्व्हिस सेंटरला भेटीची वेळ ठरवा आणि आधार कार्डसह आवश्यक सरकारी ओळखपत्रे नक्की सोबत ठेवा.
ग्राहक सेवा प्रतिनिधीला सांगा BSNL 4G/5G सिममध्ये अपग्रेड करायचे आहे, नंतर केवायसीसाठी आवश्यक माहिती आणि दस्तऐवज सादर करा.
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नवीन BSNL 4G/5G सिम मिळेल, त्यानंतर सूचनांनुसार सिम सक्रिय करून हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घ्या.
सिम कार्ड अपग्रेड करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करा आणि घरबसल्या सहज 4G/5G सिममध्ये अपडेट करा.