Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅकची बहुतेक लक्षणं छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं आणि थकवा येणं अशी असतात.
काहीवेळा चेहऱ्यावर देखील काही लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं थेट हार्ट अटॅकची नसली तरी, ती हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्या दर्शवू शकतात.
जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा पापण्यांवर अचानक सूज येत असेल, तर ते हृदयाच्या योग्य रक्ताभिसरण न होण्यामुळे असू शकते. हे हॉर्ट अटॅकचं लक्षण मानलं जातंय.
जर चेहऱ्याचा रंग अचानक निळा किंवा पिवळा दिसत असेल, तर ते हृदयाच्या कार्यक्षमतेत कमी झाल्याचं लक्षण असू शकते.
काहीवेळा डोळ्यांच्या पापण्यांच्या खाली किंवा भोवती पिवळ्या रंगाचे छोटे जमाव दिसतात. हे कोलेस्ट्रॉलचे असतात.
हार्ट अटॅकची वेदना अनेकदा छातीतून सुरू होऊन जबडा, मान, किंवा डाव्या हातापर्यंत पसरू शकते.
यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास विशेषतः ती अचानक आणि तीव्र स्वरूपाची असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.