Shreya Maskar
1999 च्या कंधार हायजॅकिंग हिरो कॅप्टन देवी शरण ची खरी कहाणी जाणून घ्या.
इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट 814 चे 24 डिसेंबर 1999 रोजी पाच सशस्त्र लोकांनी हायजॅक करण्यात आले.
हे हायजॅकिंग काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट चे होते. विमान वाहतूक इतिहासातील हे सर्वात मोठे आणि भयंकर हायजॅकिंग होते.
या हायजॅकमध्ये आठ दिवस 188 प्रवासी आणि क्रू अडकले होते. 37 व्या वर्षी कॅप्टन शरण यांनी निडरपणे या परिस्थितीचे नेतृत्व केले.
कॅप्टन शरण हे यावेळी कुटुंबासोबत वेळ घालवायला जात होते. मात्र ते या जीवघेण्या परिस्थितीत सापडले.
जेव्हा लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाला उतरण्याची परवानगी नाकारली, तेव्हा कॅप्टन शरणने ऐवढ्या लोकांना कसे वाचवायचे याचा विचार केला.
ही आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी क्रॅश लँडिंग करण्याची योजना आखली. तसेच लाहोर एटीसीला विमानाला लँडिंग करण्यास भाग पाडले.
भारतात परतल्यावर, कॅप्टन शरणला त्याच्या शौर्याबद्दल गौरवण्यात आले. तसेच त्याच्या प्रसंगावधानाचे कौतुक देखील करण्यात आले.
कॅप्टन शरण यांनी IC 814 प्लेन हायजॅकिंग अनुभवाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक श्रींजॉय चौधरी यांच्यासोबत लिहिले.
या पुस्तकाचे नाव 'फ्लाइट इनटू फियर' हे आहे. अनुभव सिन्हाची सिरीज, त्याच्या टाटयल सोबत कॅप्टन शरणची चित्तथरारक कथा जिवंत करते. यामध्ये विजय वर्माने साहसी पायलटची भूमिका केली आहे.
विजय वर्मा कॅप्टन शरणला भेटला आणि त्याच्या शांत स्वभाव आणि धैर्य वृतीने खूप प्रभावित झाला.
NEXT : तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका...; अभिनेत्री शर्वरी वाघचं ELLE साठी खास फोटोशूट