Shreya Maskar
पावसाळा ऋतु आनंदासोबत अनेक समस्याही घेऊन येतो.
पावसात सर्वांना पडणारा एकच प्रश्न म्हणजे 'पावसात भिजलेली छत्री किंवा रेनकोट सुकवायचा कसा?'
पावसात भिजलेली छत्री किंवा रेनकोट सुकवण्याच्या घरगुती साध्या, सोप्या ट्रिक्स जाणून घ्या
मायक्रोफायबर कापड इतर कपड्यांच्या तुलनेत लवकर पाणी शोषून घेतो. त्यामुळे पावसात ओला रेनकोट आणि ओली छत्री तुम्ही मायक्रोफायबर कापडाच्या मदतीने पुसून घ्यावी.
हल्ली सर्वघरात हेअर ड्रायर सहज उपलब्ध असते. त्यामुळे याच्या मदतीने तुम्ही ओली छत्री आणि रेनकोट सहज सुकवू शकता.
रेनकोट सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करत असाल तर, ड्रायरचे तापमान कमी ठेवावे. जास्त तापमान राहिल्यास रेनकोट जळण्याची शक्यता आहे.
पावसात छत्री आणि रेनकोट ओला झाल्यास डायरेक्ट पंख्याखाली वाळवू नका. त्याआधी थोडा वेळ या दोन्ही गोष्टी पाणी जाण्यासाठी बाथरूममध्ये टांगून ठेवा.
ओली छत्री आणि रेनकोट जास्त काळ ओला ठेवू नये. त्यामुळे छत्री आणि रेनकोटला कुबट वास येऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.