Dhanshri Shintre
केळ्याचे शिकरण हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
केळ्याचे शिकरण खाण्याचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत.
केळा आणि दूध ऊर्जा पुरवणारे आहेत. त्यामुळे शिकरण खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते.
शिकरणातील व्हिटॅमिन्स त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
केळ्यातील पोटॅशियम आणि दुधातील पोषकद्रव्ये हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
शिकरणातील पोटॅशियम स्नायूंना बळकटी देते आणि क्रॅम्प्स टाळण्यास मदत करते.
काही जणांना दूध आणि केळे एकत्र खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.
शिकरणात साखर जास्त प्रमाणात असल्यास ती लठ्ठपणा आणि मधुमेहास कारणीभूत ठरू शकते.
रात्री शिकरण खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो, त्यामुळे ते दिवसा खाणे जास्त योग्य असते.
NEXT: काळ्या मिठाचे पाणी पिण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे