Manasvi Choudhary
बदलापूर या शहराला प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे.
मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या बदलापूर शहराला फार पूर्वीपासून महत्वाचे स्थान आहे.
पेशवेकाळात बदलापूर शहराला परगण्याचे मुख्य ठिकाण अशी ओळख होती.
पूर्वी बदलापूर या शहराचे नाव मौजे बदलापूर उर्फ चोण असे होते.
वसईच्या मोहिमेवेळी चिमाजी अप्पा बदलापूर येथे राहायला होते.
शिवकालीन मराठे सैनिक घोडे येथे बदलायचे म्हणून या ठिकाणाला बदलापूर हे नाव पडलं अशी माहिती आहे.