Dhanshri Shintre
कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, थकवा आणि आळशीपणा कमी होतो, त्यामुळे कार्यक्षमता वाढते.
अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करते, अनेक गंभीर आजार कमी होतात आणि डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुधारते.
कोमट पाण्यात मध किंवा लिंबाचा रस घालून सेवन केल्याने मेटाबॉलिझम रेट वाढतो, पचन सुधारते आणि वजन कमी होते.
अँटी-बॅक्टेरियल गुण शरीराला संक्रमणजन्य आजारांपासून संरक्षण करतात, त्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते.
उन्हाळ्यात 2-3 चमचे मध पाण्यात किंवा इतर शीतपेयांमध्ये मिसळून घेतल्याने आरोग्याला फायदे होतात.