ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुर्वेदानुसार, तुळस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
तुळस खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यासह तुमची त्वचा देखील निरोगी राहाते.
तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंसट्स आणि पोषक तत्वं आढळतात.
दररोज रिकाम्यापोटी तुळशीचे पान खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पान खाल्ल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
तुळशीचे पान खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहाते.
तुळशीचे पान खाल्ल्यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.