Shruti Vilas Kadam
किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते. त्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते आणि सर्दी-खोकला व संसर्गांपासून संरक्षण मिळते.
किवीमध्ये ‘ॲक्टिनिडिन’ हे एन्झाइम असते, जे अन्नाचे पचन सुलभ करते. बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्यांवर किवी उपयुक्त ठरते.
अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E मुळे त्वचा निरोगी, चमकदार राहते. सुरकुत्या व एजिंगची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
किवीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
किवी कमी कॅलरीचे फळ असून फायबरयुक्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. डायट करणाऱ्यांसाठी किवी उत्तम पर्याय आहे.
किवीमध्ये ल्यूटिन आणि झिअक्सॅन्थिन हे घटक असतात, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि वयोमानानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या कमी करण्यास मदत करतात.
किवीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही हे फळ उपयुक्त ठरते.