Manasvi Choudhary
जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या स्वयंपाकघरात काही बदल करणे महत्वाचे आहे.
स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचे स्थान मानले जाते. येथील सकारात्मक ऊर्जा घरात पैसा आणि समृद्धी टिकवून ठेवते.
रात्री जेवलेली खरकटी भांडी बेसिनमध्ये तशीच ठेवल्याने नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करते. वास्तूनुसार, रात्री खरकटी भांडी बेसिनमध्ये ठेवू नका यामुळे लक्ष्मी माता नाराज होते
किचनमध्ये मिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नका. मीठ हे राहूच्या दोषांपासून संरक्षण करते आणि घरातील बरकत टिकवून ठेवते.
जर तुमच्या किचनमधील नळ टपकत असेल, तर ते गंभीर आर्थिक नुकसानाचे लक्षण मानले जाते. यामुळे घरातील पैसाही विनाकारण खर्च होतो
स्वयंपाक केल्यावर ओटा तसाच घाण ठेवल्याने अन्नाचा अपमान होतो. अस्वच्छ ओटा राहू-केतूचे दोष वाढवतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात.
वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरातील सदस्यांचे आजारपण वाढते आणि बराच पैसा औषधोपचारावर खर्च होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.