Manasvi Choudhary
स्वयंपाकघर हे कोणत्याही घराचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. स्वयंपाकघरात आपण कुटुंबासाठी जेवण बनवतो ज्याचा संबंध आरोग्याशी आणि घरातील सुख- समृद्धीशी जोडला जातो.
आजकाल अनेक गृहीणी आधुनिक जीवनशैलीनुसार स्वच्छतेसाठी किंवा पायांना थंडी लागू नये म्हणून पायात चप्पल घालतात.
वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये जेवण बनवताना पायात चप्पल घालणे योग्य आहे का? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात अन्नपूर्णेचा वास असतो. स्वयंपाकघराला मंदिराइतकेच पवित्र मानले जाते. अशा पवित्र ठिकाणी चप्पल घालणे अत्यंत चुकीचे मानले जाते.
स्वयंपाकघरात चप्पल वापरल्याने सकारात्मकता नष्ट होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा मानसिक ताण वाढू शकतो.
चपल्लच्या तळव्यांना विविध जीवाणू आणि जंतू चिकटू शकतात. स्वयंपाकघरातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे हे जंतू वेगाने पसरू शकतात. यामुळे अन्नजन्य संसर्ग, पोटाचे विकार किंवा अन्न विषबाधेचा धोका वाढू शकतो
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.