Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, स्वयंपाकघराविषयी अनेक महत्वाचे नियम सांगितले आहेत. स्वंयपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसून सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचे केंद्र देखील मानली जाते.
स्वंयपाकघरातील 5 महत्वाचे बदल घरातील सुख- समृद्धी आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करतात.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे. स्वयंपाकघर स्वच्छ असल्याने माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो.
वास्तुशास्त्रानुसार, स्टोव्ह- शेगडी आणि सिंक हे कधीही बाजूला असू नये. अग्नी आणि पाणी हे परस्परांच्या विरुद्ध घटक आहेत. यामुळे घरात आर्थिक चणचण आणि कुटुंबात वाद होऊ शकतात.
स्वयंपाकघरातील डाळी, तांदूळ, गहू किंवा इतर अन्नधान्याचे डब्बे कधीही रिकामे होऊ देऊ नका. संपायला आले की ते लगेच भरून ठेवा.
स्वयंपाकघरात, उष्टे अन्न किंवा कचरा जास्त वेळ साचून ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा आणि गॅस शेगडी पूर्णपणे स्वच्छ करून ठेवावी.
स्वयंपाकघरात पाण्याचे भांडे, मडके आणि फिल्टर हे नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे संपत्तीवर सकारात्मक परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.