Kitchen Vastu Tips : किचनमध्ये ‘या’ 5 वस्तूंचे डबे चुकूनही रिकामे ठेवू नका, मोठ्या संकटात याल

Manasvi Choudhary

स्वयंपाकघर

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याची जागा नसून ते घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते.

Kitchen Vastu Tips

स्वयंपाकघरातील वास्तूटिप्स

स्वयंपाकघराशी संबंधित अनेक नियम वास्तुमध्ये सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्यास घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक स्थिती सुधारते.

Kitchen Vastu Tips

कोणते 5 डब्बे रिकामे ठेवू नयेत?

वास्तुशास्त्रानुसार,स्वयंपाकघरा मधील कोणत्या महत्त्वाच्या वस्तूंचे डबे रिकामे ठेवू नयेत हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kitchen Vastu Tips

पिठाचा डबा

स्वयंपाकघरातील गव्हाच्या पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नये. पिठाचा डबा संपण्याच्या आधीच तो पुन्हा भरून ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार, पिठाचा डबा रिकामा ठेवल्यास कुटुंबातील मान-सन्मान कमी होतो आणि मानसिक ताण वाढू शकतो.

Flour Container

हळदीचा डबा

हळद गुरू ग्रहाशी संबंधित मानली जाते. स्वयंपाकघरात हळदीचा डबा किंवा बरणी रिकामी असणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात शुभ कार्यांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि आर्थिक प्रगती मंदावते.

Turmeric Container

तूप किंवा तेलाचा डबा

स्वयंपाकघरातील तूपाचा किंवा तेलाचा डबा कधीही रिकामा ठेवू नका. तूप आणि तेल हे घराच्या समृद्धीचे प्रतीक मानले जातात. हे डबे रिकामे राहिल्यास घरातील सुख-समृद्धी आणि संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो.

Ghee or Oil Container

मिठाचा डबा

वास्तुशास्त्रानुसार मीठ हे राहू आणि केतू या ग्रहांशी संबंधित मानले जाते. मिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा ठेवू नये. डबा रिकामा झाल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Salt Container

तांदळाचा डबा

तांदूळ हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. स्वयंपाकघरातील तांदळाचा डबा नेहमी भरलेला असावा. तांदळाचा डबा रिकामा राहिल्यास घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

Rice Container

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Latest Mangalsutra Designs: 6-7 ग्रॅममध्ये बनवा सुंदर सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स करवा चौथसाठी बेस्ट

6-7 Gram Gold Mangalsutra for Karwa Chauth
येथे क्लिक करा...