Kitchen Tips: बटाटे फ्रिजमध्ये का ठेवू नये?

Manasvi Choudhary

बटाटे

बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने केवळ त्याची चव बदलत नाही तर आरोग्यासाठी देखील घातक ठरू शकते.

Kitchen Tips

स्टार्चचे रूपांतर होते

बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असतो. जेव्हा बटाटे फ्रिजमध्ये ठेवले जातात, तेव्हा त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते

Kitchen Tips

चव बदलते

फ्रिजमध्ये बटाटे ठेवल्यामुळे गोड लागतात, जे भाजी किंवा पराठ्यांसाठी चांगले नसतात. तसेच, शिजवल्यानंतर त्यांचा पोत खराब होतो ते पचपचीत किंवा पिठासारखे लागतात.

Kitchen Tips

रंग बदलतो

फ्रिजमधील साखरयुक्त बटाटे तळल्यानंतर काळपट होतात व ते आतून नीट शिजत नाहीत.

Potato | yandex

कोरड्या जागेत ठेवा

बटाटे फ्रिजमध्ये नाही, तर घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे हवा खेळती असेल आणि जागा कोरडी असेल.

Potato | yandex

सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

बटाट्यांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. जास्त प्रकाशात राहिल्याने बटाटे हिरवे पडतात, जे विषारी असू शकतात.

Potato

कांदे - बटाटे एकत्र ठेवू नका

बटाटे आणि कांदे कधीही एकत्र ठेवू नका. कांद्यातून निघणाऱ्या वायूंमुळे बटाटे लवकर सडतात किंवा त्यांना लवकर मोड येतात.

Potato | yandex

next: Daily Skin Care: दररोज फक्त 5 मिनिटं करा स्किन केअर , दिवसभर चेहरा राहील फ्रेश

येथे क्लिक करा...