Priya More
किचनमध्ये स्वयंपाक करत असताना अचानक गॅस पाईपमध्ये आग लागली तर ती कशी विझवायची हे प्रत्येकाला माहिती पाहिजे.
गॅस पाईपमध्ये आग लागल्यास ही आग गॅस सिलिंडरपर्यंत पोहचू नये यासाठी सिलिंडरवर ओले कापड टाका. ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करा.
तुम्हाला ओला कपडा लगेच मिळाला नाही तर तात्काळ जाड कापड घ्या किंवा एकादे भांडे गॅस सिलिंडरवर उलटे टाका.
गॅस पाईपला आग लागल्यास तात्काळ सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करा. यामुळे मोठा धोका टळतो.
जाड कापड, एकादे भांडे उपलब्ध नसेल तर तुम्ही झाडूचा वापर करून आग विझवू शकता. झाडूने मारून तुम्ही आग रोखू शकता.
गॅसच्या पाईपला आग लागल्यास तात्काळ घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा. त्यामुळे वायू बाहेर पडेल आणि हवा खेळती राहील.
गॅसच्या पाईपला आग लागल्यास इलेक्ट्रॉनिक स्विच बोर्ड चुकूनही चालू किंवा बंद करू नका.
काडीपेटी, रेग्युलेटर, बिडी, सिगारेट किंवा दिवा यासारख्या कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा वापर करू नका.
गॅसच्या पाईपला आग लागल्यास तात्काळ अग्निशमन दलाला फोन करा.