ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवणाचा डबा ऑफिसला घेऊन जाताना बऱ्याचदा त्यातून भाजी बॅगेत सांडली जाते.
बॅगेत असलेल्या सर्व वस्तूही भाजीच्या तेलाने खराब होतात.
आज काही ट्रिक्स पाहूयात ज्याची मदत तुम्हाला नक्की होईल.
भाजी व्यवस्थित राहावी असे वाटत असल्यास एअरटाइटचा डबा वापरावा.
बाजारात मिळणारे सिलिकॉन सीलचे डब्बे तुम्ही भाजी घेऊन जाण्यासाठी वापरु शकता.
डब्ब्यात कधीही अतिशय गरम पदार्थ भरल्यास त्यावर लगेच झाकण लावू नये.
डब्ब्यात भाजी भरल्यानंतर डब्याला क्लिंग रॅपने झाकून ठेवावे.