Kitchen Tips : लोखंडाच्या कढईत विसरूनही शिजवू नका 'या' गोष्टी; आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

Saam Tv

हे पदार्थ शिजवणे टाळा

लोखंडाच्या कढईत नक्की कोणत्या गोष्टी शिजवणे टाळले पाहिजे, ते जाणून घेऊया

foods not to cook in iron | PINTEREST

अंडी

अंडी कधीही लोखंडाच्या कढईत शिजवू नयेत. अंड्याच्या पांढऱ्या भागात सल्फर असते, जे लोखंडासोबत रासायनिक प्रक्रिया करते. यामुळे अंडी काळी पडू शकतात आणि त्यांची चवही बिघडते.

Eggs | PINTEREST

गोड पदार्थ

लोखंडाच्या कढईत गोड पदार्थ किंवा डेझर्ट बनवणे टाळावे. यामध्ये गोड पदार्थांना लोखंडाची चव येऊ शकते आणि त्याचा रंगही बदलू शकतो.

Deserts/Sweets | PINTEREST

कढी

कढी बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. दही हे आम्लयुक्त असते. लोखंड आणि आम्लयुक्त घटक एकत्र आल्यामुळे कढीची चव खराब होते आणि ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Kadhi | PINTEREST

पालकाची भाजी

पालकामध्ये मुबलक प्रमाणात आयर्न (लोह) आणि ऑक्सॅलिक ॲसिड असते. जेव्हा पालक लोखंडाच्या कढईत शिजवला जातो, तेव्हा लोखंड ऑक्सॅलिक ॲसिडसोबत रिॲक्शन करते, ज्यामुळे भाजीचा रंग काळा पडतो आणि चव बिघडते.

Spinach Curry | PINTEREST

लिंबू किंवा आंबट पदार्थ

लिंबाचा स्वभाव आम्लयुक्त असतो. लोखंडाच्या कढईत लिंबू किंवा इतर आंबट पदार्थ वापरल्यास अन्नाची चव कडवट किंवा तुरट होऊ शकते.

Lemon / Acidic Foods | PINTEREST

काय होऊ शकते नुकसान?

लोखंडाच्या कढईत वारंवार आम्लयुक्त पदार्थ शिजवून खाल्याने शरीरात गरजेपेक्षा जास्त लोह जमा होऊ शकते. यामुळे हेमोक्रोमॅटॉसिस नावाची समस्या उद्भवू शकते.

foods not to cook in iron | PINTEREST

शरीरावर कोणते परिणाम होतील

शरीरात अतिप्रमाणात लोह साचल्यामुळे यकृत, हृदय आणि स्वादुपिंडावर दुष्परिणाम होऊन यकृताचे आजार किंवा मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

foods not to cook in iron | PINTEREST

NEXT : सावधान! जास्त चहा-कॉफी पिताय? तुमची किडनी होतेय खराब; रिपोर्टमधील धक्कादायक खुलासे

caffeine effect on organs | saam tv
येथे क्लिक करा