Saam TV News
तज्ज्ञांच्या मते, चहा-कॉफीमधील कॅफीनमुळे शरीरात लघवीचे प्रमाण तात्पुरते वाढू शकते. पण मर्यादित सेवन केल्याने नुकसान होत नाही.
कॅफीनचे जास्त सेवन केल्याने शरीरात उच्च रक्तचाप (High Blood Pressure) वाढू शकतो. हाच पुढ जाऊन 'क्रॉनिक किडनी डिसीज'चा मोठा धोका बनतो.
चहामध्ये 'ऑक्सालेट' नावाचे घटक असतात. याचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन (पथरी) तयार होण्याची शक्यता वाढते.
चहा किंवा कॉफीमध्ये भरपूर साखर, फ्लेवर सिरप किंवा क्रीमी घटक वापरल्यास लठ्ठपणा आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.
मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर हे दोन्ही आजार किडनी खराब होण्याचे मुख्य कारण मानले जातात. त्यामुळे चहा-कॉफी पिताना साखरेचे प्रमाण सांभाळा.
ज्या लोकांना आधीपासूनच हायपरटेन्शन किंवा किडनीशी संबंधित आजार आहेत, त्यांनी कॅफीनचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) मते, सामान्य प्रौढ व्यक्तीने दिवसातून ४०० मिलिग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेऊ नये. अतिप्रमाण टाळावे.
चहा-कॉफीच्या नादात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. दिवसभरात भरपूर पाणी पिणे किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
किडनी निरोगी ठेवायची असेल तर चहा-कॉफीचे सेवन मर्यादित ठेवा, साखरेचा वापर टाळा आणि रक्तातील साखर व रक्तदाब नियंत्रणात ठेवा!
NEXT : चहा की कॉफी सकाळी काय पिणे फायदेशीर?