Shraddha Thik
भारतीयांच्या रोजच्या जेवणात चपाती असते. चपाती भाजी खाल्ल्याशिवाय अनेकांचे पोटच भरत नाही तर काहींना चपातीपेक्षा भात जास्त खायला आवडतो.
चपाती करताना काही बेसिक चुका केल्यामुळे त्यातील पोषक तत्व कमी होत जातात आणि शरीराला पुरेपूर फायदा मिळत नाही.
तुम्ही कोणत्याही धान्याची चपाती करत असाल तरी नॉन स्टिक तव्याचा वापर करू नका.
नेहमी लोखंडाच्या तव्यावर चपाती करा. यामुळे चपाती अधिक हेल्दी बनते. मातीच्या तव्यावर केलेली चपातीही फायदेशीर ठरते.
गरम चपाती एल्यूमिनियम फॉईलमध्ये लपटून ठेवू नका. या चपातीला फॉईल्सचे बारीक कण चिकटतात. जे सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो.
जेव्हाही तुम्ही चपाती करत असाल तेव्हा 5 ते 10 मिनिटांसाठी कणीक बाजूला ठेवून द्या. यामुळे चपातीचे पीठ व्यवस्थित सेट होते. यात गुड बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे चपाती सॉफ्ट आणि फुललेली बनते.
कणीक मळताना त्यात थोडं तेल घाला जेणेकरून चपात्या मऊ राहील. ज्यामुळे चपात्या भाजायला जास्तवेळ लागणार नाही आणि मॉईश्चर टिकून राहिल्यामुळे पोळी लवकर कडक होणार नाही.