Rohini Gudaghe
लोणचं बनवण्यासाठी मिरच्या धुवून घ्या. त्यानंतर त्यांचे देठ काढून मधोमध कापा.
एका भांड्यात जिरे, बडीशेप, मेथी दाणे आणि मोहरी चांगली भाजून घ्या.
त्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करा.
चिरलेल्या मिरच्यांमध्ये तिखट, मीठ, हळद, हिंग, बडीशेप, जिरे, बडीशेप, मेथी दाणे, मोहरीची पावडर टाका.
गरम झालेले तेल मिरच्यांमध्ये टाका. सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
या मिश्रणात लिंबू पिळा आणि एकत्र करा.
हवा बंद काचेच्या बरणीमध्ये मिरचीचं लोणचं भरुन ठेवा.