ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण जवळजवळ सगळ्याच भाज्यांना जिऱ्याची फोडणी देतो.
जिऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जसे की, पचन सुधारणे व रोगप्रतिकारशक्ती वाढवणे.
जिऱ्याची फोडणी पदार्थांना अधिक रुचकर बनवते.
पण काही भाज्यांना जिऱ्याची फोडणी दिल्यास चव बिघडू शकते.
भेंडीच्या भाजीला जिऱ्याची फोडणी दिल्यास भाजीला चिकटपणा येतो.
फ्लॉवर आणि बटाट्याच्या भाजीला जिऱ्याची फोडणी दिल्यास भाजीचा वास वाढतो. त्याऐवजी मोहरी किंवा हिंगाची फोडणी द्या.
जिऱ्याच्या फोडणीमुळे हिरव्या पालेभाज्यांच्या खरी चव कमी होते.
जिऱ्याची फोडणी दिलेल्या कोबीच्या भाजीला जास्त वास येतो. त्याऐवजी आलं किंवा हिंग वापरा.
दुधी किंवा लाल भोपळ्यासारख्या सौम्य भाज्यांना जिऱ्याची फोडणी दिल्यास चव बिघडते.