Shreya Maskar
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात देवघर कधीही नसावे. स्वयंपाकघरात देव्हारा ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात देवघर ठेवणे टाळा.
कारण स्वयंपाकघरात मांसाहारी किंवा तामसिक अन्र बनवले जाते. ज्यामुळे देवघराची पवित्रता, सकारात्मक ऊर्जा कमी होते.
अनेक जणांचे घर खूप छोटे असते, अशावेळी त्यांना देव्हारा किचनमध्येच ठेवावा लागतो. अशावेळी देवघर किचनमध्ये ईशान्य किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर असावे. देवाचे तोंड स्वयंपाक करताना पाठीमागे किंवा डाव्या-उजव्या बाजूला पडणार नाही याची काळजी घ्यावी.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील देवघर किंवा मंदिरासाठी ईशान्य कोपरा सर्वात शुभ दिशा आणि जागा मानली जाते.
या क्षेत्रावर दैवी ऊर्जेचे अधिष्ठान असते आणि येथे सकाळच्या सूर्याची पहिली, पवित्र करणारी किरणे पडतात. जर ईशान्य कोपरा उपलब्ध नसेल, तर पूर्व किंवा उत्तर दिशा हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
मूर्ती अशाप्रकारे ठेवा की त्या पश्चिम किंवा पूर्वेकडे पाहतील. यामुळे प्रार्थना करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे राहते, ज्यामुळे शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
देवघर किंवा मूर्ती लाकूड किंवा संगमरवरापासून बनवलेल्या उंच चौथऱ्यावर ठेवा. ते जमिनीपासून पुरेशा उंचीवर असावे आणि बसलेल्या स्थितीत साधारणपणे तुमच्या छातीच्या किंवा डोळ्यांच्या पातळीवर असावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात देवघर कधीही नसावे. स्वयंपाकघरात देव्हारा ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात देवघर ठेवणे टाळा.
NEXT : गणरायाच्या नैवेद्यासाठी ५ मिनिटांत बनवा तळणीचे मोदक, १ सोपी ट्रिक वापरली तर कधीच फुटणार नाहीत