Saam Tv
आपण सिलेंडर आणि शेगडीची काळजी घेतो, पण रेग्युलेटरकडे दुर्लक्ष करतो. हे ४ संकेत दिसल्यास समजून जा, वेळ आली आहे
सिलेंडरपासून शेगडीपर्यंत गॅस पोहोचवण्यात रेग्युलेटरची भूमिका महत्त्वाची असते. यात बिघाड झाल्यास मोठा अपघात घडू शकतो, त्यामुळे वेळीच सावध राहा.
रेग्युलेटरवर त्याची उत्पादनाची तारीख तपासा आणि गॅस एजन्सीकडून त्याचे योग्य आयुष्य किती आहे याची माहिती घ्या. निश्चित कालावधी संपल्यावर तो आवर्जून बदला.
रेग्युलेटरमधून सतत हवा बाहेर पडल्यासारखा आवाज आल्यास गॅस गळती असू शकते. स्वतः दुरुस्त न करता ताबडतोब गॅस एजन्सीशी संपर्क साधा.
शेगडीची ज्योत अचानक कमी-जास्त होत असेल किंवा पिवळी दिसत असेल, तर रेग्युलेटर किंवा बर्नरमध्ये बिघाड असू शकतो. मेकॅनिककरडून तपासणी करून घ्या.
रेग्युलेटरवर जंग लागला असल्यास किंवा तो तुटलेला-फूटलेला आढळल्यास टेप न लावता तो नवीन बदलून घ्या. खराब रेग्युलेटर वापरणे धोकादायक ठरते.
गॅसचा वास आल्यास काडीपेटी किंवा लाइटर पेटवू नका आणि विजेचे स्विचही लावू नका. दरवाजे-खिडक्या उघडा आणि इमर्जन्सी नंबर १९०६ वर कॉल करा.
रेग्युलेटर नेहमी अधिकृत मेकॅनिककडूनच बदलावून घ्या. स्वतःहून तो बसवणे किंवा बदलणे टाळा. दर ५ वर्षांनी गॅस कनेक्शनची कसून तपासणी करून घ्या.
NEXT : वजन वाढवण्याची चिंता संपली, डेली डाएटमध्ये समाविष्ट करा 'हे' 9 हेल्दी स्मूदीज