ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाट्यांमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो. उकडताना हा स्टार्च पाण्यात मिसळतो आणि कुकर काळा होण्यास सुरुवात होते. तर जाणून घ्या कुकरचा काळपटपणा कसा घालवावा.
कुकरमध्ये एक ग्लास पाणी आणि एक लिंबाचा रस घाला. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे उकळवून घ्या. नंतर मिश्रण थंड झाल्यावर स्क्रबरने घासा याने काळेपणा कमी होण्यास मदत होते.
गरम कुकरमध्ये अर्धा ग्लास पांढरा व्हिनेगर आणि पाणी घाला. ते 5 मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर काही वेळाने कुकर धुवून पुसा कुकरची चमक परत येईल.
बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही तयार केलेली पेस्ट काळ्या भागावर लावा व 10 मिनिटे तशीच ठेवून द्या. 10 मिनिटानंतर कुकर स्क्रबरने घासून घ्या डाग निघून जातात.
चिंचेचा कोळ पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर चिंचेचे पाणी कुकरमध्ये टाका आणि उकळवून घ्या. हा नैसर्गिक उपाय काळेपणा काढण्यासाठी खूप प्रभावी आहे.
कुकरच्या आत मीठ भुरभुरून लिंबाच्या सालाने घासून घ्या. कुकरवर असलेले डाग निघतात आणि वासही जाण्यास मदत होते.
कुकर धुताना कुकरचे गॅसकेट वेगळे काढून ठेवा. तसेच स्टील स्क्रबर जोरात वापरू नका आणि नेहमी कुकर थंड झाल्यावरच धुवा.
कुकरमध्ये बटाटे उकडताना थोडे मीठ घाला आणि बटाटे उकडल्यानंतर लगेच पाणी काढून टाका. सगळे झाल्यावर कुकर लगेच धुवून टाका.