ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणत्याही चमचमीत पदार्थाला चार चांद लावणारी भाजी म्हणजे कोथिंबीर.
हिरव्या मसाल्यात वापरली जाणारी कोथिंबीर योग्य प्रमाणे स्टोअर केली नाही तर, लवकर खराब होते.
पण आता ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही कोथिंबीर वर्षभर साठवून ठेवू शकता.
यासाठी संपूर्ण हिरवी असलेली भरपूर कोथिंबीर घ्या. पिवळी पाने घेऊ नका.
कोथिंबीर निवडून घेताना सगळी जाड देठं काढून टाका.
एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात २ चमचे मीठ घाला. या पाण्यात निवडलेली कोथिंबीर कमीत कमी १० मिनिटे भिजवून ठेवा.
यानंतर कोथिंबीर ७ ते ८ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
कोथिंबीर चिरून झाल्यावर एका सुती कपड्यावर पसरवा. २ ते ३ दिवस पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्या.
सुकलेली कोथिंबीर एका हवा बंद डब्यात भरून ठेवा. आणि वर्षभर वापरा.