ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भांड्यावर राहिलले तेलाचे डाग, तसेच ओलाव्याच्या संपर्कात भांडी जास्त येतात आणि गॅसवर अधिक काळ राहिल्यामुळे भांडी काळवंडतात. स्टिलच्या भांड्याचा काळपटपणा घालण्यातकरिती घरगुती ट्रिक्स वापरुन बघा भांडी नवीसारखी झळाळून दिसतील.
लिंबू, बेकिंग सोडा,व्हिनेगर, मीठ आणि पाणी हे घटक भांडी चमकविण्यासाठी पुरेस आणि स्वस्तात मस्त असे उपाय आहेत.
अर्धा लिंबू कापा व भांड्यावर गोलाकार पद्धतीने घासून घ्या. लिंबू भांड्यांवर घासल्याने भांड्यांचा तेलकटपणा व जिद्दी बसलेले डाग लगेच निघण्यास मदत होते.
बेकिंग सोडा आणि पाण्याची जाडसर अशी पेस्ट बनवून घ्या.हि पेस्ट भांड्यांवर लिंबाने माखलेल्या भागावर लावा आणि काही वेळ लावून ठेवा. नंतर स्वच्छ धुवून पुसून घ्या हे जळलेले डाग मऊ करतो.
थोडे मीठ लावून हलक्या हाताने भांड्यांवर लावा. मीठ नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते आणि भांड्यांचा पृष्ठभाग चमकवते.
व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण बनवून ते काळवंडलेल्या भांड्यांवर स्प्रे करा आणि काही काळ भांडी त्यात भिजवत ठेवा. नंतर स्वच्छ धुवून घ्या यामुळे भांडी नव्यासारखी चमकतील.
भांडी घासताना साबणाचा वापर कमी प्रमाणात करावा आणि रगडून स्क्रब करू नये, त्याने भांड्यावर ओरखडे पडू शकतात. भांडी गरम पाण्यात ठेवल्यास भांड्यांचा तेलकटपणा आणि चिकटपणा निघून जातो.