भाजी करपली? फेकून देऊ नका, दह्याची ही सोपी ट्रिक वापरून बघा

Manasvi Choudhary

किचमधील छोटीशी चूक

स्वयंपाकघरात काम करताना आपल्याकडून कधीकधी छोटीशी चूक होते आणि संपूर्ण मेहनत वाया जाते. भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवताना त्यात चुकून मीठ, तिखट जास्त होणे किंवा भाजी जास्त शिजून करपणे या समस्या होतात.

Kitchen Hacks 2026

पदार्थाची चव

भाजी जरा जरी करपली की तिचा जळलेला वास संपूर्ण पदार्थाला येतो आणि चव बिघडते.

Remove Burnt Smell

सोपी ट्रिक

पदार्थ करपला की तो खाण्यायोग्य नसतो अशावेळी आपण तो फेकून देतो. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत जी तुम्ही भाजी करपली की वापरू शकता.

Fix Burnt Food

करपलेला भाग ढवळू नका

एखादा पदार्थ करपला की तुम्ही सर्वातआधी त्यावरचा भाग काढून टाका. भांड्याच्या तळाला चिकटलेला, करपलेला भाग ढवळू नका कारण जळलेला वास संपूर्ण भाजीला येऊ शकतो.

Smart Cooking Tricks

दही मिक्स करा

भाजी दुसऱ्या भांड्यात काढल्यानंतर त्यात १ ते २ चमचे ताजे दही घाला आणि मंद आचेवर १-२ मिनिटे भाजी पुन्हा गरम करा. दह्याचा आंबटपणा आणि मलईदार पोत जळलेली चव संतुलित करतो.

Curd Benefits in Cooking

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, करपलेल्या भाज्यांचा वास आणि चव कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरू शकते.

Cooking Tips

असा करा उपयोग

भाजी खूप करपली असेल तर ती पूर्णत: नीट होऊ शकत नाही. हलकी करपलेल्या भाजीची चव सुधारण्यासाठी ही युक्ती तुम्ही करू शकता.

Smart Cooking 2026

NEXT: चाळिशीनंतरही चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो; सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा चंदनाचे 'हे' 3 फेसपॅक

Chandan Facepack For Glowing Skin
येथे क्लिक करा..