ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा स्क्रबर हा स्टील, प्लास्टिक किंवा फायबरचा बनलेला असतो. तो भांड्यांना चिकटलेली घाण काढण्यासाठी वापरला जातो.
एक स्क्रबर हा ७ ते १५ दिवसांपर्यंत वापरणे योग्य असते. जास्त दिवस वापरल्यास तो आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
जास्त दिवस स्क्रबर वापरल्याने जंतू, बॅक्टेरिया आणि दुर्गंधी निर्माण होते, जी भांडी घासतना भांड्यांवर पसरू शकते.
स्क्रबर तुटलेला, वास येत असेल, फार मऊ झालेला असेल किंवा काळवंडलेला दिसत असेल तर तो बदलणे गरजेचे आहे.
स्टील स्क्रबर ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त वापरू नये, कारण त्यात लवकर जंतू पकडतात.
प्लास्टिक किंवा फायबर स्क्रबर १० ते १५ दिवस वापरता येतो, पण त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते.
दररोज भांडी घासल्यानंतर स्क्रबर पाण्याने धुवून, साबण लावून स्वच्छ करून उन्हात वाळवत ठेवावा. उन्हात ठेवल्याने स्क्रबर वरील जंतू नाहीसे होतात.
स्वच्छ भांडी घासता येतात. तसेच जंतु आणि दुर्गंधी टाळता येते.