ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाक करताना किंवा बाहेर खाताना कपड्यांवर तेलाचे डाग सहज पडतात. हे डाग लवकर काढले नाहीत तर कायमचे बसतात.
ताजे डाग पटकन निघतात डाग जितका ताजा, तितका तो काढणं सोपं. लगेच उपाय केला तर कपड्याला इजा न होता डाग निघतो.
कागद जास्त तेल शोषून घेतो. डागावर टिश्यू पेपर किंवा न्यूज पेपर ठेवा. हलक्या हाताने दाबा पण चोळू नका. चोळले की डाग आजूबाजूला पसरतात.
घरगुती आणि प्रभावी उपाय डागावर टाल्कम पावडर, बेबी पावडर किंवा कॉर्नफ्लोअर टाका. २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. पावडर तेल शोषून घेण्यास मदत करते.
कपडा हलकासा झटकून घ्या. ब्रशने किंवा हाताने पावडर काढून घ्या. डाग खूप फिक्कट हलका झालेला दिसेल.
तेल काढण्यासाठी हा खास उपाय मानला जातो. पडलेल्या डागावर थोडा लिक्विड डिशवॉश साबण लावा. बोटांनी किंवा मऊ ब्रशने तो चोळा आणि १० मिनिटे ठेवून द्या.
पाणी जास्त गरम नसावे पाण्याचे योग्य तापमान महत्त्वाचे आहे.कपड्याच्या लेबलनुसार कोमट पाण्याने धुवा. गरम पाणी लगेच वापरू नका, नाहीतर डाग घट्ट बसू शकतो.
जुन्या डागांसाठी बेकिंग सोडा डागावर टाकून त्यावर लिक्विड साबण लावा हे मिश्रण ३० मिनिटे ठेवा आणि मग धुवा.
डाग पूर्ण निघेपर्यंत इस्त्री करू नका नाहितर डाग भडक दिसतील. तसेच वेळेत उपाय केल्यास कपडे नवीनसारखे दिसतात.