ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कांदा कापून झाल्यावर हातांना वास येण्यास सुरुवात होते. मग हातांचा वास घालविण्याकरिता हे सोपे उपाय करा.
कांदा कापून झाल्यानंतर हातांना वास येत असल्यास तुमचे हात स्टेनलेस स्टिलचा भांड्यावर घासा. असे केल्यास हातांना येणारा वास निघून जातो.
कांदा कापल्यावर हातांना लिंबाचा रसाने धुवा, वास गायब होईल.
ग्राउंड कॉफी बीन्सने हात घासून घ्या, ते एक नैसर्गिक दुर्गंधीनाशक आहे. हे वापरल्यास हातांचा वास जातो.
तसेच बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावून हात धुवा, याने वास दूर होईल.
हातांना व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा आणि मग धूवून टाका.
कांदा कापताना कांद्याला आधी ५ ते १० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्यास कांदा झोबंत हि नाही आणि हातांना वाससुध्दा येत नाही.
हे उपाय करुन हातांना येणारा कांद्याचा वास गायब होऊन मुक्तता मिळेल.