ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात लसूण कसा साठवावा हि एक मोठी समस्या निर्माण होते. पण काहि सोप्या ट्रिक्समुळे लसूण ताजा हि राहिल आणि ओलसर न होता दिर्घकाळ टिकेल.
लसूण ओलसर वातावरणात लवकर खराब होतो, काळा पडतो आणि कुजण्यास सुरुवात होते.
सोललेला लसूण लवकर खराब होऊन ,काळा पडण्यास सुरुवात होते, म्हणून लसूण फोडी वेगळ्या करा पण सोलू नका.
लसूण हवा खेळती राहील अशा डब्यात ठेवा.लोखंडी चालणी, जाळीचे डबे, कापडी पिशवी किंवा टोपली यामध्ये ठेवावा. असे केल्यास ओलोवाा जमा न होता बुरशी हि लागत नाही.
तांदुळात लसूण साठवण्याची जुनी पण खात्रीशीर पद्धत आहे.एका भांड्यात तांदूळ भरा आणि त्यात लसूण ठेवून द्या.तांदुळ ओलावा शोषतो आणि लसूण महिनाभर ताजा राहतो.
लसणाच्या फोडींना हलकं तेल लावून काचेच्या बरणीत ठेवा.ही पद्धत फंगस होऊ देत नाही आणि चवही टिकते.
फ्रिजमध्ये लसूण बिनधास्त ठेवू नका. फक्त सोललेला लसूण एअरटाइट डब्यात तसेच टिश्यू पेपरसोबत ठेवल्यास महिनाभर टिकतो.
लसूण योग्य पद्धतीने साठवल्यास वाया जाणार नाही. एक महिना ताजा राहून चव आणि सुगंध कायम राहिल.