Saam TV News
स्वयंपाकघरात भांडी घासण्यासाठी वापरले जाणारे स्पंज काही काळानंतर खराब आणि जीर्ण होऊ शकतात. बहुतेक लोक त्यांना निरुपयोगी समजून सरळ कचऱ्यात फेकून देतात.
पॅकिंग,क्राफ्टिंग आणि घरातील छोट्या-मोठ्या अडचणींसाठी स्पंज फायदेशीर ठरतो. जुन्या किचन स्पंजचे असेच ५ उपयोग खालीलप्रमाणे आहेत
घरातील एखाद्या लहान वस्तीला रंग द्यायचा असेल किंवा टच-अप करायचा असेल, तर तुम्ही ब्रशऐवजी जुन्या स्पंजचा वापर करू शकता.
काचेचे ग्लास, बाटल्या किंवा सिरॅमिकच्या वस्तू पॅक करताना स्पंजचे तुकडे कुशनचे काम करू शकतात.
नळ किंवा पाईपमधून थोडे पाणी गळत असेल आणि दुरुस्तीसाठी वेळ लागत असेल, तर स्पंज पाण्याचा निचरा करण्यासाठी काही वेळ मदत करू शकतो.
जुन्या स्पंजचा वापर करून तुम्ही मुलांच्या क्राफ्टसाठी सोपे स्टॅम्प तयार करू शकता.
कपाट किंवा स्टोरेज बॉक्समध्ये ठेवलेल्या वस्तूंच्यामध्ये स्पंजचे लहान तुकडे ठेवल्यास त्या एकमेकांवर आदळण्यापासून सुरक्षित राहतात.
कोणत्याही जुन्या स्पंजचा पुन्हा वापर करण्यापूर्वी तो पूर्वी कोणत्या पदार्थांच्या संपर्कात आला होता हे तपासा. त्यावर रसायने किंवा तेलकट मळ साचला असेल,तर तो पुन्हा वापरू नका.
NEXT : वांगी आणि दही एकत्र खाताय? आरोग्याला होणारे 5 मोठे नुकसान जाणून घ्या