Food Combination : वांगी आणि दही एकत्र खाताय? आरोग्याला होणारे 5 मोठे नुकसान जाणून घ्या

Saam Tv

वांग्याचे गुणधर्म

वांग्यामध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच यात अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात.

Eggplant and Yogurt | pinterest

दहीचे गुणधर्म

दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी१२, रायबोफ्लेविन आणि पोटॅशियम असे पोषक घटक आढळतात.

Eggplant and Yogurt | pinterest

वांगे आणि दही एकत्र खाण्याचे ५ मोठे तोटे

अनेकदा लोक वांग्याची भाजी आणि जेवणात दही एकत्र ताटात वाढून खातात. हे दोन वेगवेगळे पदार्थ एकत्र खाणे आरोग्यासाठी वाईट ठरू शकते.

Eggplant and Yogurt | pinterest

पाचनसंस्था बिघडते

जर तुम्ही वांगे आणि दही एकत्र खाल्ले, तर पोट बिघडू शकते. या दोन्हीचे सेवन केल्याने पोट फुगणे, अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या होऊ शकते.

Digestion Problems | pinterest

त्वचेची एलर्जी

आयुर्वेदानुसार वांगे आणि दही हे चुकीचे फूड कॉम्बिनेशन मानले जाते, ज्यामुळे स्किन एलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर रॅशेस किंवा चट्टे उठू शकतात.

Skin Allergy | pinterest

हाडे आणि सांधेदुखी

थंड आणि उष्ण तासीर असलेल्या वांगे आणि दही एकत्र खाल्ल्याने सांधेदुखी होऊ शकते. दोन्ही पदार्थांचे गुणधर्म पूर्णपणे विरुद्ध असतात, ज्यामुळे हाडांमध्ये वेदना वाढू शकतात.

Joint Pains | pinterest

सर्दी-खोकल्याचा त्रास

ज्या लोकांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो त्यांनीही वांगे आणि दही एकत्र खाणे टाळावे.यामुळे शरीरात कफ, सर्दी आणि खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Cold and Cough | pinterest

गर्भावस्थेत खाणे टाळावे

गर्भधारणेदरम्यान जर तुम्ही वांगे आणि दही एकत्र खाल्ले, तर पोटदुखी आणि आतड्यांमध्ये सूज येऊ शकते.

Avoid in Pregnancy | pinterest

टीप

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येसाठी आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Eggplant and Yogurt | pinterest

NEXT : शाकाहारी आहारासाठी प्रोटीनचा कोणता स्रोत आहे अधिक चांगला?

paneer and soya | saam tv
येथे क्लिक करा