Manasvi Choudhary
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी तुम्ही फेस योगा प्रकार करा. फेस योगा प्रकार केल्याने चेहऱ्यावरची त्वचा उजाळते.
महागड्या ब्युटी ट्रीटमेंटपेक्षा तुम्ही घरीच फेस योगा प्रकार करू शकता. 'किस अँड स्माईल' हा योगा प्रकार केल्याने त्वचेचा पोत सुधारतो
सर्वप्रथम तुमचे ओठ अशा प्रकारे बाहेर काढा जसे तुम्ही कोणाचे तरी 'चुंबन' घेणार आहात किंवा 'पाऊट करा यामुळे गालाच्या स्नायूंचा मसाज होतो.
त्याच स्थितीतून लगेच आपले ओठ मागे खेचून एक मोठी आणि रुंद 'स्माईल' करा हसताना ओठ बंद ठेवा किंवा दात दिसले तरी चालतील, पण ओठांच्या कडा कानापर्यंत खेचल्या जातील असा प्रयत्न करा.
'किस अँड स्माईल' या योगा क्रियेमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि चेहरा गोरापान व तेजस्वी दिसू लागतो.
या योगासनामुळे ओठांच्या बाजूला असलेल्या 'स्माईल लाईन्स' आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
फेस स्कल्पटिंगमुळे गालांचे स्नायू टोन्ड होतात आणि जबड्याची लाईन (Jawline) शार्प दिसते.