Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Dhanshri Shintre

कायनेटिक स्कूटर

८०-९० च्या दशकात कायनेटिक स्कूटरने भारताच्या रस्त्यांवर वर्चस्व गाजवले. सुमारे ४१ वर्षांपूर्वी, कायनेटिकने होंडासोबत डीएक्स स्कूटर लाँच केली होती.

विक्रीसाठी लाँच

आज कायनेटिकने भारतात त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर डीएक्स ईव्हीचा अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केला आहे.

किंमत

कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केली आहे. DX ची किंमत १,११,४९९ रुपये आणि DX+ ची किंमत १,१७,४९९ रुपये आहे.

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दशकांचा वारसा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करून अनेक प्रगत फीचर्ससह सादर केली आहे.

एलईडी हेडलाइट

नवीन कायनेटिक डीएक्समध्ये खास एलईडी हेडलाइट असून, दोन्ही बाजूंना कायनेटिक लोगो आकाराच्या एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (DRL) दिल्या आहेत.

पाच रंगांमध्ये उपलब्ध

कंपनी कायनेटिक डीएक्स इलेक्ट्रिक स्कूटर पाच रंगांमध्ये उपलब्ध करत आहे, ज्यात लाल, निळा, काळा, पांढरा आणि चांदीचा रंग आहे.

रेंज, पॉवर

या स्कूटरचा कमाल वेग ९० किमी/तास असून ती तीन रायडिंग मोड्ससह येते, रेंज, पॉवर आणि टर्बो पर्याय उपलब्ध आहेत.

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

कायनेटिक डीएक्समध्ये ८.८ इंचाचा खास इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ज्याची डिझाइन जुनी कायनेटिक डीएक्स स्कूटर लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

NEXT: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

येथे क्लिक करा