Saam Tv
दही, रवा, मिरची, भिजवलेले तांदूळ, मीठ, अदरक, इनो, लाल तिखट,साखर, कोथिंबीर इ.
एका मिक्सरमध्ये रवा, मीठ, तांदूळ, दही, साखर टाकून बारिक पेस्ट तयार करा.
आता ही पेस्ट एका मोठ्या खोलगट भांड्यात काढा.
या भांड्यात आता बाकीचे उरलेले जिन्नस मिक्स करून घ्या आणि फेटून घ्या.
आता एका मोठ्या स्टीमर किंवा कढईमध्ये पाणी उकडवायला ठेवा.
आता बॅटर एका तेल लावलेल्या ताटात काढून घ्या. त्यावर लाल तिखट घाला.
आता हे ताट कढईत ठेवा आणि त्यावर झाकण ठेवा.
१० मिनिंटात तयार होईल तुमचा इंस्टट नाश्ता.