Siddhi Hande
प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षेसाठी काही तत्वांचे पालन करायला हवे.
शाळेत कोणत्याही व्यक्तीला नोकरीवर रुजू करण्याआधी त्या व्यक्तीचे पोलिस वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.
शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुड टच आणि बॅड टच तसेच पॉक्सो कायद्याबाबत ट्रेनिंग द्यायला हवे.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला गुड टच आणि बॅड टचबाबत शिकवायला हवे.
जर मुलींसोबत कोणीही गैरवर्तवणूक केली, त्यांना काही वस्तू खायला दिली किंवा त्यांना वाईट पद्धतीने हात लावला तर शिक्षकांना किंवा पालकांना सांगायचे, हे शाळेने शिकवायला हवे.
जर शाळेत विद्यार्थ्यांना कोणी त्रास देत असेल, वाईट पद्धतीने स्पर्श करत असेल तर त्या व्यक्तीविरोधात पोलिस तक्रार करायला हवी.
मुलींना जर कोणी वाईट हेतूतून मिठी मारली, स्पर्श केला तर त्यांना तो बॅड टच कसे ओळखावे, याबाबत शिक्षकांनी माहिती द्यायला हवी.