Alisha Khedekar
किडनी स्टोनची वेदना कमरेच्या बाजूने सुरू होऊन पोटाखाली किंवा जांघेकडे पसरते. पाठदुखी सहसा पाठीपुरती मर्यादित असते.
किडनी स्टोनची वेदना अचानक सुरू होते आणि खूप तीव्र असते. रुग्णाला शांत बसणेही कठीण होते.
सामान्य पाठदुखी वाकणे, बसणे किंवा उभे राहणे यामुळे वाढते किंवा कमी होते. किडनी स्टोनमध्ये असे होत नाही.
लघवी करताना जळजळ किंवा वेदना होत असल्यास ते किडनी स्टोनचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.
लघवी लालसर, गडद किंवा रक्तमिश्रित दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किडनी स्टोनमुळे अनेकदा मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवते. सामान्य पाठदुखीत ही लक्षणे नसतात.
किडनी स्टोनची वेदना असह्य असते, तर सामान्य पाठदुखी बहुतेक वेळा सहन करता येण्यासारखी असते.
NEXT : घसा दुखणे गंभीर आजार? Throat Cancer ची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या