Manasvi Choudhary
आजकाल किडनी स्टोनची समस्या झपाट्याने वाढत आहे. तरूणांसह वृद्धापर्यंत सर्वांनाच किडनी स्टोन उद्भवतो.
बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही किडनी स्टोन होण्याची मुख्य लक्षणे आहेत यावर उपाय म्हणून तुम्ही आहारात बदल करणे महत्वाचे आहे.
किडनी स्टोनची समस्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होते. जेव्हा कॅल्शियम, ऑक्झॅलेट आणि युरिक अॅसिडसारखे घटक शरीरात जमा होतात आणि त्यांना विरघळण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही तेव्हा त्याचे खडे तयार होतात.
किडनी स्टोनच्या समस्येसाठी शरीरात पुरेसे प्रमाणात पाणी असणे महत्वाचे आहे. दररोज किमान २.५ ते ३ लीटर पाणी प्या.
किडनी स्टोन असणाऱ्यांनी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. दूध, दही यापांसून बनवलेले पदार्थ खा.
आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. पालक, बीट, रताळे, सुकामेवा या पदार्थांचे सेवन करा.
चिकन, अंडी, मासे यामुळे युरिक अॅसिडचा धोका वाढतो. हे पदार्थ शरीरातील सायट्रेटची पातळी कमी करतात त्यामुळे किडनी स्टोन वाढू शकतो.
लठ्ठपणा यामुळे किडनी स्टोनचा धोका अधिक वाढतो यामुळे वजन कमी करणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.