Manasvi Choudhary
किडनी स्टोन ही एक गंभीर समस्या आहे. किडनी स्टोन झाल्यास आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
किडनी स्टोन झाल्यास व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेतली नाही तर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
किडनी स्टोन झाल्यास पाणी भरपूर प्यावे. नियमितपणे १० ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
लिंबू, संत्री, द्राक्षे यासारंख्या आंबट फळाचे सेवन करा. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवन करा. दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या खा.
आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. मीठामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. अंडी, मासे खाणे टाळावे यामुळे यूरिन अॅसिड होण्याची शक्यता अधिक वाढते.
कोल्ड ड्रिंक, अल्कोहोल, प्रोसेस फूडचे सेवन करणे टाळावे यामुळे शरीरातील साखर वाढण्याची शक्यता आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.