ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर पाणी प्यायल्याने स्टोन बाहेर पडण्याची शक्यता असते. म्हणून, ३ ते ४ लिटर पाणी प्या.
कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन टाळण्यास मदत होते. म्हणून दूध, चीज, दही खा. पण यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संत्री, लिंबू, द्राक्षे या सिटरस फळांमध्ये सायट्रेट भरपूर प्रमाणात असते, जे किडनी स्टोन रोखण्यास मदत करते.
सफेद भाताऐवजी ब्राउन राइस खा. याशिवाय चपाती, बीन्स आणि ओट्सचा समावेश करा. संपूर्ण दान्यात फाबरचे प्रमाम जास्त असते. जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.
पालक, बीटरूट, चॉकलेट, नट, ब्लॅक टी हे सर्व ऑक्सलेटने समृद्ध आहेत, त्यांच्यापासून दूर रहा.
जास्त सोडियममुळे यूरिक अॅसिडची पातळी वाढू शकते, म्हणून प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पांढरे मीठ कमीत कमी खा.
जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर जास्त चहा आणि कॉफी पिणे थांबवा. तसेच कोल्ड्रिंक्स पिणे टाळा त्यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅसिड स्टोनचा धोका वाढवते.