ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणतीही दुखापत झाल्यास किंवा जखम झाल्यास लोक हळद लावण्याचा सल्ला देतात.
पण जखमेवर हळद लावल्याने जखम खरोखरच बरी होते का? चला जाणून घेऊया.
खरंतर, हळदीमध्ये अँटी-इन्फ्नेमेन्टरी, अँटी-बायोटिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात.
हळद एक नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करते, ज्यामुळे जखमेमध्ये होणारे संसर्ग टाळता येतात. हळदीचे हे गुणधर्म संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करतात.
हळद त्वचेतील पेशींच्या पुनरुत्पादनाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे जखम लवकर भरून निघते.
जर जखम खोल असेल किंवा संसर्ग झाला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.