ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अननसामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखे पोषक तत्व असतात.
अननसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अननसाचा रस प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.
अननसाच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
अननसाच्या रसात कॅलरीज कमी असतात. जर तुम्हाला वजन कमी करायेच असेल तर तुम्ही याचे सेवन करु शकता.
अननसाच्या रसामध्ये आढळणारे अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म हिरड्यांच्या सुजलेल्या भागांपासून आराम देण्यास मदत करतात.
अननसाच्या रसात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडांची ताकद वाढते.
अननसाचा रस प्यायल्याने त्चवचेकील कोलाजनचे उत्पादन वाढते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.