ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात डासांच्या वाढत्या संख्येमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढतो. म्हणून डासांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या.
पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही पलंगाभोवती मच्छरदाणी लावू शकता. यामुळे डास चावणार नाही आणि झोप देखील चांगली होईल.
बाजारात डासांपासून बचाव करण्यासाठी अनेक क्रिम आणि स्प्रे उपलब्ध आहेत. या क्रिम आणि स्प्रेचा वापर केल्याने दूर पळतात.
पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी घराचे कोपरे पूर्णपणे स्वच्छ करा. असे केल्याने डास येणार नाहीत.
काही वनस्पती डासांना दूर ठेवण्यास खूप मदत करतात. वाढत्या पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही ही झाडे तुमच्या घरात लावू शकता.
तुम्ही मच्छरदाणी, मच्छर रॅकेट किंवा मशीनचा वापर करु शकता.
पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी, दिवसा आणि रात्री फुल स्लीवज कपडे घाला. असे केल्याने तुम्हाला डास चावणार नाही.