Harmful Habits : तुम्हीही एकाच दमात पाण्याची बाटली संपवताय? 'ही' छोटीशी चूक बेतेल जीवावर

Shreya Maskar

एका दमात पाणी पिणे

अनेकांना अशी सवय असते की, कामावरून आल्यावर, जीमवरून आल्यावर किंवा तहान लागल्यावर पाण्याची बाटली एका दमात किंवा श्वासात संपवतात. मात्र असे करणे आरोग्यास घातक ठरते.

Drinking water in one breath | pinterest

पाणी जीवन

पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीराच्या अवयवांना वेळेवर पाणीपुरवठा न झाल्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा येतो, ज्यामुळे विविध आजारांचा धोका निर्माण होतो.

Water life | pinterest

आरोग्य तज्ज्ञांचे मत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीर ज्या वेगाने द्रव पदार्थ बाहेर टाकते, त्यापेक्षा अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात द्रव सेवन केल्यास 'हायपोनेट्रेमिया' (hyponatremia) नावाची धोकादायक स्थिती उद्भवू शकते.

Opinion of health experts | pinterest

किडनीवर कसा परिणाम होतो?

अधिक वेगाने पाणी प्यायल्याने रक्त विरळ होऊ शकते आणि त्यातील सोडियमची पातळी कमी होते. सोडियमची पातळी कमी झाल्यामुळे मूत्रपिंड थेट निकामी होत नसून किडनीसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात.

How are the kidneys affected? | pinterest

इतर अवयवांवर परिणाम

एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने मेंदूला सूज येणे, फिट्स (आचके) येणे, कोमात जाणे किंवा मृत्यू ओढवणे यांसारखे परिणाम होऊ शकतात.

Effects on other organs | pinterest

मूत्रपिंडांवर ताण

तहानलेल्या मूत्रपिंडांवर पाण्याचा अचानक जास्त भार पडल्याने त्यांच्या नेफ्रॉन्सचे (nephrons) नुकसान होते, ज्यामुळे विविध गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Stress on kidneys | pinterest

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे नेहमी बसून, हळूहळू घोट घेत पाणी पिणे. एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी, ते थोड्या थोड्या प्रमाणात प्यावे, जेणेकरून तुमचे शरीर त्याचा योग्य वापर करू शकेल.

What is the correct method of drinking water? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रात्री पायांमध्ये दिसतात 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

Bad Cholesterol | AI PHOTO
येथे क्लिक करा...