Surabhi Jayashree Jagdish
किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मात्र रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे किडनीवर हळूहळू ताण येऊ लागतो. या सवयी कोणत्या आहेत त्या पाहूयात.
शरीरात पुरेसं पाणी नसल्यास किडनीला रक्तातील घाण फिल्टर करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ साचू लागतात आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.
अतिरिक्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढतं आणि रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाब हा किडनी खराब होण्यामागील एक मोठा कारण मानला जातो. सतत जास्त खारट पदार्थ खाल्ल्यास किडनीवर अतिरिक्त ताण येतो.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर औषधं घेणं किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. अशा औषधांमुळे किडनीपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. दीर्घकाळ या सवयीमुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
बराच वेळ लघवी रोखून ठेवल्यास किडनीवर दबाव वाढतो. त्यामुळे युरिन इन्फेक्शन आणि किडनी इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. नियमितपणे ही सवय असल्यास किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
जंक फूडमध्ये मीठ, साखर आणि अनहेल्दी फॅटचं प्रमाण जास्त असतं. हे पदार्थ शरीरातील वजन वाढवतात आणि मधुमेह किंवा रक्तदाबाचा धोका वाढवतात. या दोन्ही समस्या किडनी खराब होण्याचं मोठं कारण ठरतात.
सिगारेटमधील हानिकारक रसायनं रक्तवाहिन्यांवर परिणाम करतात आणि किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करू शकतात. जास्त मद्यपान केल्याने शरीरात डिहायड्रेशन निर्माण होतं.