Shreya Maskar
निरोगी आयुष्य जगण्यासाठी चांगल्या सवयी असणे खूप महत्त्वाचे असते. कारण तुम्हाला छोट्या वाटणाऱ्या सवयीच मोठ्या मोठ्या आजारांचे कारण ठरू शकतात.
आजकाल हृदय मधुमेह आणि हाय बीपीसोबतच किडनीची समस्या देखील वाढताना दिसत आहे. विशेषता पावसाळ्यात किडनीचे आरोग्य धोक्यात येते, त्यामुळे कोणत्या सवय किडनीचे आरोग्य धोक्यात आणतात, आताच जाणून घेऊयात.
तुम्ही वारंवार छोट्या-मोठ्या दुखण्यावर पेनकिलर घेत असाल तर आताच थांबा. यांचा अतिरिक्त सेवनाने मूत्रपिंडांकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो.
अनेकांना पदार्थांवर जास्तीचे मीठ टाकून खाण्याची सवय असते. जी घातक ठरते. जास्त सोडियमच्या सेवनाने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे तुमच्या मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांवर ताण येतो.
पावसाळ्यात थंड वातावरणामुळे आपण पाणी कमी पितो. कमी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये योग्य प्रकारे बाहेर टाकली जात नाहीत आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.
कामाच्या गडबडीत आपण अनेक वेळा लघवी रोखून धरतो, ज्याचा किडनीवर ताण, दाब येतो. त्यामुळे संसर्ग किंवा दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
किडनीचे आरोग्य कायम चांगले ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा. अतिरिक्त साखर आणि अतिप्रक्रिया केलेल्या घटकांमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होतो, जे मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये अडथळा आणतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.