Manasvi Choudhary
शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि रक्ताचे शुद्धीकरण किडनी करते यासाठी किडनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही आहारात बदल करणे महत्वाचे आहे.
रोजच्या आहारात भाज्या आणि फळांचा समावेश केल्यास किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आहारात फ्लॉवरचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन सी आणि फायबर ही पौष्टिक गुणधर्म मिळतात.
किडनीच्या आरोग्यासाठी लाल सिमला मिरची ही भाजी खा. यातील व्हिटॅमिन ए, सी, बी शरीरासाठी फायदेशीर आहेत.
लसूणमधील नैसर्गिक गुणधर्म किडनीच्या पेशींचे संरक्षण करते. तर कांद्यामधील क्वेरसेटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते, जे किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.